आमच्याविषयी काहीसे ...

नमस्कार मंडळी, फक्त गोप्रेमी... गो सेवक...गोरक्षक... न होता एक आदर्श गोपालक प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी व्हावं हीच वात्सल्य युनिक प्रॉडक्ट्स ची अपेक्षा आहे. आणि हे कधी साध्य होईल जर गाय शेतकऱ्याकडेच राहिली तर.... शेतकऱ्याकडे गाय कशी राहील... तर तिच्यापासून मिळणाऱ्या उत्पादनातून शेतकऱ्याला काही फायदा झाला तरच ती विकली जाणार नाही पर्यायाने कापली जाणार नाही, म्हणूनच आम्ही हे प्रशिक्षणाचे अभियान हाती घेतली आहे. आज या केमिकलच्या दुनियेत विषमुक्त अन्न तयार करायचे असेल तर देशी गाय शिवाय पर्यायी नाही ती बाळगत असताना येणाऱ्या अडचणी त्यासाठी आपण काय काय करू शकतो तसेच शेण गोमूत्र पासून तयार होणारे प्रोडक्ट काय किमया करू शकतात याची जाणीव प्रशिक्षणानंतर आपणास झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक देशी गोपालक शेतकरी हा व्यवसाय करू शकतो यासाठी कोणत्याही प्रकारचे मोठे मोठे मशीन लागत नाही, 80 टक्के रॉ मटेरियल हे गाय असल्यामुळे आपल्या जवळच उपलब्ध असते...... त्यामुळे उत्पादनांची प्रोडक्शन कॉस्ट आपल्या बऱ्यापैकी हातात असते गरज असते आपण पिकवले ते विकण्याची.... हे सर्व शिकण्याची संधी.... आम्ही मागील दहा वर्षांपासून करत असलेल्या कार्यातून स्वतः बनवलेल्या उत्पादनातून, आमच्या आलेल्या चांगल्या वाईट अनुभवातून मांडणार आहोत. 🙏🙏

डॉ.आदेश काशीद
संस्थापक
10
वर्षाचा यशस्वी अनुभव

वात्सल्य युनिक प्रॉडक्ट्स

दर्जेदार उत्पादने निर्मिती सोबत सर्वोत्कृष्ट गोपालन करून एक आदर्श कृषी व्यवसायिक तयार होण्याची संधी म्हणजे वात्सल्य युनिक प्रोडक्ट्स

वात्सल्य युनिकची विविध उत्पादने

गोरक्षणी "स्वरक्षण"।ऐसे पूर्वजांचे कथन ।
म्हणोनीच गायी करिता प्राण। दिले अनेक शुरांनी ।।
श्रीकृष्ण आणि शिवशंकर। वशिष्ठ आणि दत्त दिगंबर।
दिलीप शिवाजी गोसेवा तत्पर। संत अपार गोभक्त।।
✍️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

img

शेतीपूरक
उत्पादने

img

पंचगव्य
उत्पादने

img

दुग्धजन्य
उत्पादने

img

उत्पादनांचे
प्रशिक्षण

Call Us

+91 70839 01901

Mail Us

vatsalyauniqueproducts@gmail.com

X