फेसपॅक पावडर (Facepack powder)

100.00

वात्सल्य फेसपॅक हे आमचे उत्पादन तुम्हा ग्राहकांच्या हातात देत असताना आम्हाला खुप आनंद होत आहे.
देशी गायीच्या शुध्द स्वरूपातील गोवऱ्या कुटुन वस्त्रगाळ करुन बनविलेले गोमय चूर्ण तसेच शतावरी चूर्ण, चूर्ण, कपुर कचरी, त्रिफळा चूर्ण, आंबेहळद, वेखंड चूर्ण अशा सौंदर्यवर्धक वनस्पतींचे चूर्ण वापरून बनविले आहे.
तसेच यामध्ये देशी गायीच्या शुध्द तुपाचा वापर केला आहे. देशी गायीच्या गोमय चूर्णामुळे तसेच विविध सौंदर्यवर्धक वनस्पतींमुळे हा फेसपॅक अतिशय उच्च प्रतीचा तयार झाला आहे. वात्सल्य युनिक फेसपॅकच्या वापरामुळे चेहऱ्यावरील वांगाचे डाग नाहीसे होण्यास मदत होते. तसेच फेसपॅक आणि गोमय चंदन साबण यांचा एकत्रितरित्या वापर केल्यास चेहऱ्यावरील डाग व तारुण्यपिटीका नाहीसे होण्यास मदत होते. तसेच फेसपॅकच्या वापरामुळे चेहऱ्याला ग्लो येऊन सकारत्मक व्यक्तिमत्व वाढीस लागते.

Categories:

फेसपॅक का वापरावे?

  • सौंदर्यवर्धक वनस्पती व गोमय वापरून बनविलेले
  • चेहऱ्यावरील वांगाचे (pigmentation) डाग नाहीसे होण्यास मदत होते
  • तारुण्यपिटीका नाहीसे होण्यास मदत होते
  • चेहऱ्यावरती ग्लो येऊन सकारात्मक व्यक्तिमत्व वाढीस लागते
  • १००% केमिकल फ्री
  • हँडमेड उत्पादन

फेसपॅक कसा वापरावा
१) प्रथमतः स्वच्छ पाण्याने चेहरा धवून घ्यावा.
२) एक चमचा फेसपॅक मध्ये दुध टाकून पेस्ट बनवुन घ्यावी व त्या पेस्टचा चेहऱ्यावर हळुवारपणे लेप लावावा.
३) लेप सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाणी घेऊन वात्सल्य गोमय चंदन साबणाने स्वच्छ धुवावा.
वात्सल्य गोमय फेसपॅक १००% केमिकल विरहित असल्याने आपणाकडून निसर्गसंवर्धन देखील होते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फेसपॅक पावडर (Facepack powder)”

X